‘अस्सं सासर…..’ मालिकेत संतोष जुवेकर परतणार

0

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेच्या कथानकाला नुकतीच कलाटणी मिळाली आहे. या मालिकेची कथा यश आणि जुई या दोन व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते.

पण काही दिवसांपूर्वी या मालिकेत यशचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. यश हा प्रेक्षकांचा लाडका असल्याने यशच्या मृत्युमुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता. यशच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला आता जुईच सांभाळत आहे. एक सून म्हणून नव्हे तर घरातील मुलगी म्हणून ती आपली प्रत्येक कर्तव्य बजावत आहे.

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई आणि यश यांची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडायची. आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या मालिकेत आता संतोष जुवेकर परतणार आहे.

संतोष मालिकेत परतणार असला तरी तो या मालिकेत यशची भूमिका साकारणार आहे की दुसऱ्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याबद्दल मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. पण संतोष या मालिकेत परत येणार असल्याने त्याच्या फॅन्सना प्रचंड आनंद होणार आहे यात काहीच शंका नाही.

संतोषसोबतच या मालिकेत आणखी एका कलाकाराची एंट्री होणार आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या सायली पाटीलचा देखील संतोष सोबत या मालिकेत प्रवेश होणार आहे. या मालिकेत संतोष आणि सायली कोणत्या भूमिका साकारतात हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*