Type to search

असे वकील भाग्यानेच भेटतात!

अग्रलेख संपादकीय

असे वकील भाग्यानेच भेटतात!

Share
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून आश्चर्यकारक आणि अद्भूत माहिती लोकांसमोर येत आहे. कोणतेही काम न करणार्‍या उमेदवारांच्या संपत्तीचे भरभक्कम आकडे पिढीजात धनिकांनासुद्धा स्तंभीत करीत आहेत.

दाखल केलेल्या गुन्ह्यांची यादी त्यांच्या विनयशील विक्रमांची ओळख जगजाहीर करीत आहे. एरव्ही बोलघेेवडी नेतेमंडळी शिक्षणाच्या पाण्यात मात्र गुडघेही ओले केलेली नाहीत याचे कबुलीजबाबही प्रतिज्ञापत्रात आढळतात. मोदी मंत्रिमंडळात पूर्वी मानवसंसाधन विकास अर्थात शिक्षणमंत्रिपद भूषवलेल्या मंत्रीणबाई स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघातून भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात यंदा त्यांनी खरे शिक्षण नमूद केल्याची बोलवा आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुक्त विद्यापीठाची पदवीधर असल्याचा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून त्यांच्या शिक्षणाबद्दलची चर्चा वेगवेगळ्या माध्यमांवर होतच राहिली. राजकीय वर्तुळात तो चर्चेचा आणि बराच चेष्टेचा विषय बनला होता.

बहुपदवीधरांची शैक्षणिक योग्यता टप्प्याटप्प्याने वाढते; पण स्मृतीबाईंच्या विस्मृतीचा विक्रमच वेगळा! मुक्त विद्यापीठाच्या पदवीधर, येल विद्यापीठाच्या पदवीधर अशा अनेक चक्रव्यूहातून घरंगळत आता स्मृतीबाईंची आठवण बारावीपर्यंत घसरली आहे. गेल्यावेळी पदवीधर असल्याचा उल्लेख अनावधानाने केला गेला की आताचे प्रतिज्ञापत्र देताना त्या पदव्यांची विस्मृती स्मृती मावशीला झाली? पदव्यांचे नसलेले शेपूट लावूनसुद्धा मतदारांच्या स्मृतीवर अनुकूल परिणाम झाला नाही. निवडणुकीत त्यांना पराभवच पत्करावा लागला;

पण बाई नशीबवान! पराभूत होऊनसुद्धा त्यांना मंत्रिपदाचा खास प्रसाद मिळाला. थेट मानवसंसाधन विकास खाते मिळाले. पदव्यांच्या खरेपणाची लोकांना खात्री पटावी म्हणून त्यांनी भरपूर भाषणेही ठोकली. बाई बोलतात मात्र छानच! छोट्या पडद्यावरील ‘बहु’च्या या बहुरुपीपणाने विरोधकांच्या प्रतिभेलासुद्धा बरेच खतपाणी पुरवले. साहजिकच बारावीचा पत्ता लागल्यावर बाईंच्या शिक्षणाचे बारा वाजवण्याकरता अनेक तोंडे सरसावली.

तिथे मात्र अर्थमंत्री अरुणजी जेटलींनी संकटमोचकाची जबाबदारी का स्वीकारली हे मात्र त्यांनाच माहीत! अडचणीतील स्वपक्षीयांच्या मदतीला धावून जाण्याची जबाबदारी अरुणजी अत्यंत इमानेइतबारे पार पाडतात. एका सहकारी मंत्र्याने खोटी प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर केली तरीही त्या जबाबदारीचे भान त्यांनी सोडले नाही. विरोधक त्याला अतिउत्साही बेभानपणाही कदाचित म्हणतील, पण सध्याच्या राजकारणात हे सगळे चालायचेच!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!