असा करा चेहर्‍याचा व्यायाम!

0

आपण फिट राहण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो. परंतु कधी सुंदर दिसण्यासाठी चेहर्‍याचा व्यायम करण्याविषयी विचार केला आहे का ? शरीराबरोबरच चेहर्‍यालाही व्यायामाची आवश्यकता आहे. निरोगी आणि आणि तेजस्वी चेहर्‍यासाठी करा पुढील खास व्यायाम.
तुम्हाला फक्त इंग्रजीचे स्वर (ए, ई, आय, ओ, यू) मोठ्याने, तोंड पूर्णपणे उघडून म्हणायचे आहेत.
डोळ्यांना नेहमी आकर्षक ठेवण्यासाठी तुमच्या हाताचा अंगठा डोळ्यांच्या किनारीवरुन नकाकडून कानाकडे फिरवा. यानंतर असेच उलट फिरवा. यामुळे तुमच्या डोळ्यांवर तेज येऊन ते सुंदर दिसतील.
सरळ बसा आणि तोंडात हवा भरा. यामुळे गाल गोबरे दिसतील. यानंतर 20 सेकंदाने हावा सोडून द्या. असे रोज 10 वेळा करा.
तुमच्या आयब्रोला शक्य तेवढे डोळ्यांच्या दिशेने ओढा आणि एक मिनिटाने सैल सोडा. असे दिवसातून तीन ते पाच वेळा करा.

LEAVE A REPLY

*