अशोक दुधारेंची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर निवड

0

नाशिक : ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत माघार घेतल्याने तसेच काही अर्ज बाद झाल्यानंतर उर्वरित 12 जणांमध्ये अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांची फेरनिवड करण्यात आली.

तर उपाध्यक्ष म्हणून मागील कार्यकारिणीतील प्रल्हाद सावंत (अ‍ॅथलेटिक्स), अशोक पंडित (नेमबाजी ), प्रदीप गंधे (बॅडमिंटन) आणि जय कवळी (बॉक्सिंग) यांची निवड झाली. सरचिटणीस म्हणून विद्यमान सरचिटणीस बाळासाहेब लांडगे (कुस्ती) यांची फेरनिवड करण्यात आली तर सहचिटणीस म्हणून प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस) आणि महेश लोहार (वेटलिफ्टिंग) या दोघांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे खजिनदार म्हणून विद्यमान खजिनदार धनंजय भोसले (ज्यूदो) यांची फेरनिवड झाली. या संघटनेच्या आठ कार्यकारी सदस्यांपैकी पाच जणांना पुन्हा संधी मिळाली असून तीन नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नाशिकचे अशोक दुधारे (तलवारबाजी), अमीन दयानंदकुमार (ट्रायथलॉन) आणि विजय संतान (व्हॉलीबॉल) या तिघांचा नव्याने प्रवेश झाला असून मागील कार्यकारिणीतील पाच सदस्य अनुक्रमे चंद्रजित जाधव (खो-खो), प्रशांत देशपांडे (धनुर्विद्या), मुजताब लोखंडवाला (रोईंग), सुंदर आय्यर (लॉन टेनिस), अमरिया झुबीन सॅम (जलतरण) यांची फेरनिवड झाली.

नाशिकचा खेळातील इतिहास बघता नाशिकला प्रथमच अशा मोठ्या महाराष्ट्राच्या सर्व खेळांची पितृ संघटना असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर काम करण्याची संधी अशोक दुधारे यांच्या निवडीमुळे मिळाली आहे. अशोक दुधारे हे गेल्या 25-30 वर्षांपासून वेगवेगळ्या खेळात पदाधिकारी म्हणून विविध संघटनांवर काम करत असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार आणि शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार हे दोन्ही मनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या ते भारतीय तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत. अशोक दुधारे यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर निवड झाल्याबद्दल त्यांचे नाशिकच्या सर्व क्रीडा क्षेत्राकडून अभिनंदन होत आहे.

मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कारासाठी आवाहन
नाशिक । नाशिकमधील काळे चौकात असलेल्या मोठा राजवाडा समाजभूषण बहुउद्देशिय संस्थेतर्फे डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती विनोद बर्वे यांनी दिली. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक प्रेरणादायी व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. आंबेडकर जयंती म्हणजेच 14 एप्रिलला मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी समितीकडून विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यात आपण कोणत्या क्षेत्रात काम करता, तुमचा परिचय, समाजातील योगदान आदी माहिती इच्छुकांनी मोठा राजवाडा, काळे चौक, नाशिक या पत्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*