अशोक कारखान्याच्या अध्यक्षपदी सोपानराव राऊत

0

उपाध्यक्षपदी भाऊसाहेब उंडे

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- माजी आमदार भानुदास मुरकुटे सूत्रधार असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सोपानराव राऊत यांची तर व्हाईस चेअरमनपदी भाऊसाहेब उंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अशोक कारखान्याचे विद्यमान चेअरमन कोंडीराम उंडे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) श्रीमती संगीता डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक झाली. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने चेअरमन पदासाठी सोपानराव राऊत यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी भाऊसाहेब उंडे यांची एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

 
निवडी नंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच मावळते चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार श्री.भानुदास मुरकुटे यांनी मावळते चेअरमन कोंडीराम उंडे व व्हाईस चेअरमन दत्तत्रय नाईक यांच्या कामाचे कौतुक केले. नूतन पदाधिकार्‍यांनीही आजवरच्या परंपरेनुसार काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी माजी चेअरमन कोंडीराम बनकर, माजी सभापती इंद्रनाथ थोरात, उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सभापती सुनिता गायकवाड, अ‍ॅड.डी.आर. पटारे, हिम्मतराव धुमाळ, बाबासाहेब ढोकचौळे, माणिकराव पवार, हरिदास वेताळ, भास्कर खंडागळे, भिमराज देवकर, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक जी.पी. जाधव, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे कार्यालय अधिक्षक शंकर सुरम, संचालक मंडळाचे सदस्य, जालिंदर गायकवाड, प्रकाश पवार, लव शिंदे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*