Type to search

जळगाव

अवसायनातील पतसंस्था ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Share

जळगाव । जिल्हयातील मल्टीस्टेट असलेल्या बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडोर यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी ठेविदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्री आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकार्‍याना निवेदन देण्यात आले.

या पतसंस्थेत अनेक ठेविदार,पेन्शनर्स, शेतकरी सामान्य नागरीकांचा पैसा परत मिळविण्यासाठी सर्व ठेविदार अवसायकांच्या व कर्जदारांच्या विरोधात एकवटले असून अशा सोसायटयांना आळा घालण्यात यावा बीएचआरच्या मालमत्तेचा लिलाव करून व्याजासह परत न मिळाल्यास 14 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा या निवेदनात दिला आहे.

यावेळी राज्य ठेविदार संघर्ष समितीचे अशोक मंडोरे,दिलीप सुरवाडे,सतीष बोधनकर, सुधाकर पाटील, यशवंत कन्हेरे, इबादुल्ला खान, सरला नारखेडे,किर्ती वारके आदी सदस्य उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!