अवधूत गुप्तेचे ‘ते’ ट्वीटर अकाऊंट फेक

सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल

0

शेतकरी आपल्या हक्कासाठी १ जून पासून बेमुदत संपावर गेला आहे. त्याबाबत सोशल मीडीयावर शेतकरी संपाच्या समर्थनात अनेक मंडळी भरभरून लिहित आहे.

मात्र अचानक एखादी शेतकरी संपाबाबत अशी पोस्ट येते, आणि अनेकांच्या भुवया उंचावतात गायक- संगीतकार अवधूत गुप्तेच्या नावाचा वापर करून हे ट्विट करण्यात आले. ट्वीट असे होते की, कोणीही संपावर गेले तरी काही फरक पडत नाही.

आम्ही कोणाच्या जीवावर जगत नाही. कर्ज माफी मुळे अर्थव्यवस्था बुडेल. महत्त्वाची बाब म्हणजे या फोटोत नावापुढे ‘व्हेरिफाईड’ हे ट्विटरचे चिन्ह देखील आहे.

त्यामुळे हे अवधूत गुप्तेचेच अकाऊंट असल्याचे अनेकांना वाटले. पण, हा सर्व प्रकार लक्षात येताच अवधूतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करत परिस्थिती सर्वांसमोर आणली.

वरील पोस्टवर विश्वास न करण्याचे आवहन केले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता अवधूतने सायबर क्राईम विभागाकडे गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*