अवकाळीमुळे नाशिक जिल्ह्यातील ४७४ हेक्टर क्षेत्र बाधित ; ६०० शेतकऱ्यांचे नुकसान

0

नाशिक : कडाक्याच्या उन्हाने नाशिककरांची लाहीलाही होत असतांना रविवारी झालेल्या बेमोसमी पावसाने नागरिकांना काही काळापुरता का होईना दिलासा दिला असला तरी शेतीक्षेत्राला या अवकाळी पावसाचा चांगला तडाखा बसला आहे.

जिल्हयातील सुमारे पाचशे हेक्टर शेतीक्षेत्राचे नूकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यात सुमारे 600 शेतकरी बाधित झाले असून सात जण जखमी झाले आहेत. कांदा , द्राक्ष पिकांना सर्वाधिक फटका बसल्याचे या अहवालावरून दिसून येते.

अगोदरच शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असतांना त्यातच जिल्हा बँकेतून कर्ज उपलब्ध होत नसतांना जिल्हयात झालेल्या अवकाळीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

बहुतांश भागातील द्राक्षांचा खुडा बाकी असल्याने त्यांचे मोठे नूकसान झाले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड व देवळा, कळवण , इगतपुरी तालुक्यातील गावांना गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपले. यामध्ये जवळपास ४७४ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

*