अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार : एकाला सक्तमुजरी

0

धुळे । दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अर्जुन सुभाष मालचे (भिल) याला सक्तमजूरीची शिक्षा न्यायधीश राणे यांनी ठोठावली.

याबाबत माहिती अशी की, दोंडाईचा येथील एका अल्पवयीन मुलीवर अर्जुन सुभाष मालचे (भिल) रा. वडदे, ता. शिंदखेडा याने बलात्कार केला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात भादंवि 376 (2), आय पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी न्यायालयात सपोनि संतोष इंगळे यांनी अर्जुन मालचे विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला न्यायधीश राणे यांच्यासमोर सुरु झाला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता पराग पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासले. तपासी अंमलदार यांनी तपासात परिस्थितीजन्य पुरावा गोळा केला. तसेच अनुकूल वैज्ञानिक अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यामुळे सदर खटल्यात अर्जुन सुभाष मालचे याला दोषी ठरविले व भादंवि 376 (2) आय प्रमाणे सात वर्ष सक्तमजूरी तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 6 अन्वये दहा वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा अर्जून मालचे याला ठोठावली.

LEAVE A REPLY

*