अल्पवयीन मुलीला मारहाण

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक परिसरातील अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एक जणांसह त्याच्या अल्पवयीन तईन मुलांवर विनयभंग, अ‍ॅट्रासिअटी व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जून रोजी घडली होती. मात्र गुन्हा तब्बल आठवड्यानंतर दाखल करण्यात आला आहे.

 

तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुनील कल्याण बोनके व गावातील एका कुटुंबाचा वाद झाला होता. याचा जाब विचारण्यासाठी सुनील बोनके हा त्या कुटुंबाच्या घरी जाऊन विचारत असतांना त्यांच्याच चांगलीच बाचाबाची झाली.
यावेळी सुनील बोनके याने अल्पवयीन मुलीला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. ही घटना 21 जून रोजी घडली होती. या घटनेनंतर पिडीत कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली मात्र तेथे पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही

 

 

. यावरून त्या कुटुंबाने पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितला. यावेळी काढण्यात आलेला व्हिडीओही पोलिसांना देण्यात आला.

 

 

यानंतर पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून श्रीगोंदा पोलिसांनी तब्बल आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला.

 

 

फिर्यादीवरून सुनील कल्याण बोनगे (रा. पारगाव सुद्रिक) यांच्यासह इतर तीन अल्पवयीन मुला विरोधात विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईची फिर्याद
याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अल्पवयीन पीडित मुलीला रस्त्यात अडून शिवीगाळ व मारहाण केली होती. यानंतरही पीडित मुलीच्या घरी जावून मारहाण केल्याचे म्हटले आहे.

 

 

दरम्यान आरोपी सुनील बोनके याने पिडीत मुलीच्या घरी जावून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

*