अरबाज-मलायकाचे फायनल ब्रेकअप

0

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.

मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जास कायदेशीर मंजुरी दिली. न्यायालयाच्या या निर्णयाने त्याचं १८ वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं आहे.

अरबाज- मलायका विवाह १९९८ मध्ये झाला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये दोघांनीही परस्पर सामंजस्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

हा अर्ज मान्य करत, न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांचा मुलगा अरहान याची कस्टडी मलायकाला मिळाली, अरबाज त्याला कधीही भेटू शकेल असा निर्णय देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*