अमेरिकेने भारतातील ISIS चा चीफ रिक्रूटरला घोषित केले ग्लोबल टेररिस्ट

0
अमेरिकेने भारत आणि त्याच्या शेजारील देशातील युवकांची ISIS मध्ये भरती करणाऱ्या मोहम्मद शफी अरमर (30) ला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे.
अरमर हा भारताची निगडित ISIS चा असा पहिला दहशतवादी आहे ज्याच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
अरमरचे नाव अमेरिकेने स्पेशियली डेजिगनेटेड ग्लोबल टेररिस्ट (SDGT) या यादीत टाकले आहे. तो कर्नाटकमधील भटकळ येथे राहणारा आहे.
अरमरच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
अरमरचे नाव अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन एसेट्स कंट्रोल ऑफ द यूएस ट्रेजरी डिपार्टमेंटच्या यादीतही सामील करण्यात आले आहे. यामुळे त्याच्या आर्थिक निर्बंध लादता येणार आहेत. बहुधा या यादीत अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांची नावे असतात.

LEAVE A REPLY

*