अमेरिकेत 32 वर्षीय भारतीय नागरिकाची चाकूने वार करून हत्या

0

पंजाबच्या कपूरथला येथील रहिवासी जगजीत गुरुवारी रात्री आपले दुकान बंद करत असताना त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. जगजीत हे जवळपास 9 तास मृत्युशी झुंज देत होते पण उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.

जवळपास वर्षभरापूर्वी जगजीत अमेरिकेला गेले होते.

सिंग यांचे नातेवाईक के. एस. चीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी रात्री सिंग यांच्या दुकानात एक ग्राहक सिगारेट घेण्यासाठी आला.
सिंग यांनी नियमानुसार  त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली, पण त्याने दाखवलेले ओळखपत्र अयोग्य असल्याने दोघांमध्ये वादावादी झाली आणि तो ग्राहक निघून गेला.
त्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास जगजीत सिंग दुकान बंद करत असताना एका अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले. 9 तास मृत्युशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*