अमेरिकेत ‘हार्वे’ वादळ; २०० भारतीय विद्यार्थी अडकले

0

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात चक्रीवादळाने थैमान घातले आहे. प्रलयकारी पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अशा भयानक वातावरणाने पाच जणांचे बळी घेतले आहेत.

हा अभूतपूर्व पाऊस बुधवापर्यंत ५० इंचांनी वाढेल असे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले आहे.

गेल्या १३ वर्षांमधील सगळ्यात शक्तिशाली अशा ‘हार्वे’ चक्रीवादळाने अमेरिकेच्या मुख्य भूमीला तडाखा दिल्यानंतर आलेला हा पूर टेक्सास किनाऱ्यावर धडकल्यानंतर पाच जण ठार झाले आहेत.

२०० भारतीय विद्यार्थी अडकले :  टेक्सासला ‘हार्वे’ या चक्रीवादळाने तडाखा दिल्याने आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे ह्य़ूस्टन विद्यापीठात अडकून पडलेल्या किमान २०० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील भारतीय- अमेरिकी लोकांकडून या विद्यार्थ्यांना अन्न व इतर साहित्य पुरवण्यात येत आहे. ह्य़ूस्टनमधील भारताचे कॉन्सुल- जनरल अनुपम राय हे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहेत. शालिनी व निखिल भाटिया या २ भारतीय विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत सांगितले.

LEAVE A REPLY

*