अमेरिकेत भारतीय डॉक्टरची हत्या

0
अमेरिकेतील मिशीगन येथे एका भारतीय वंशाच्या डॉक्टरचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद स्थितीत सापडले आहे.
प्रथमदृष्ट्या हे हत्येचे प्रकरण आहे असे पोलिसांनाही दिसून आले. 32 वर्षे वय असलेले रमेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे.
येथील हेनरी फोर्ड रुगणालयात युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत डॉ. रमेश कुमार यांचा मृतदेह येथे एका कारच्या मागील सीटवर सापडला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री घडली असून रविवारी पोलिसांच्या निदर्शनास आली आहे.
मिशीगन पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. पीडित कुमार यांच्या कुटुंबियांनी कुणावरही हत्येचा संशय व्यक्त केला नाही. यासोबतच, पोलिसांनी सुद्धा तूर्तास वर्णद्वेषी हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

LEAVE A REPLY

*