अमेरिकेच्या युद्धनौकेला जहाजाची धडक; 7 जण बेपत्ता

0
जपानी सागरात अमेरिकन युद्धनौका (USS Fitzgerald) आणि फिलिपाईन्सच्या औद्योगिक जहाजात जोरदार धडक झाली आहे.
या भीषण अपघातात अमेरिकन नौदलाचे 7 जण सागरात फेकल्या गेले असून ते बेपत्ता आहेत.
तर, जहाजातील कमांडरसह 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने इतरत्र हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जपानी तटरक्षक दलांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जपानच्या सागरी किनारपट्टीजवळ यूएसएस फित्झगेराल्ड उभी असताना समोरून फिलिपाईन्सच्या व्यापारी जहाजाने शार्प यू टर्न घेतला. त्यामुळे, दोन्ही जहाजांना मोठा नुकसान झाले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अमेरिकन युद्धनौकेचे कमांडर ब्राईस बेनसन यांचाही समावेश आहे. तर, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.
जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टोक्योच्या दिशेने जाणारे जहाज आणि टोक्योहून दुसरीकडे जाणाऱ्या जहाजांसाठी एकच मार्ग आहे. अतिशय व्यस्त असलेल्या या सागरी मार्गावरच या दोन जहाजांचा अपघात झाला आहे. यासोबतच फिलिपाईन्सच्या जहाजावर तब्बल 30 हजार टन माल लादले होते. त्यामुळे, अचानक वळण घेणे महागात पडले. या घटनेचा सविस्तर तपास आणि बेपत्ता झालेल्या नौदल अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

*