अमृतवाहिनीचे विद्यार्थी जगभरात यशस्वीपणे कार्यरत

0

आ. बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

 

 

संगमनेर (प्रतिनिधी) – इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागात असून ही गुणवत्तापूर्ण व उपक्रमशिल इंग्रजी शिक्षणामुळे अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी जगातील विविध देशांत यशस्वीपणे कार्यरत असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

 

 

अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मॉडेल स्कूल, ज्युनिअर कॉलेज व इंटरनॅशनल स्कूल यामधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्‍वस्त शरयूताई देशमुख, अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य श्रीमती जे. बी. शेठ्ठी, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ.चव्हाण, प्रा. शिरभाते, श्रीमती शोभा हजारे, सौ. डंग, सौ. रणाळकर, सौ. रहाणे, पालक प्रतिनिधी डॉ. सुभाष मुंगसे, नामदेव गायकवाड, नामदेव कहांडळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

 

यावेळी कार्यक्रमात पालक प्रतिनिधी डॉ. सुभाष मुंगसे, संजय कानवडे, किरण झंवर, प्रवीण मोदी यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

 

प्रास्ताविक प्राचार्या जे. बी. सेठ्ठी यांनी केले. स्वागत श्रीमती शोभा हजारे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती कैसर शेख यांनी तर आभार शरद गोसावी यांनी मानले.

 

 

आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने कायम आपली गुणवत्ता जपली आहे. यामध्ये व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.
– शरयूताई देशमुख

LEAVE A REPLY

*