अमित शहा यांच्या हस्ते निळवंडे कालव्यांच्या कामांचा शुभारंभ

0

जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची माहितीः राहात्यात नियोजन बैठक

राहाता (वार्ताहर)- निळवंडे धरणाचे रखडलेले कालवे व चार्‍यांचे काम लवकरच सुरू होणार असुन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते या कामाचे भुमिपुजन होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली.
निळवंडे धरणाच्या रखडलेल्या चार्‍या व कालव्यांची कामे लवकरच सुरू होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे. दौर्‍याच्या नियोजनासाठी कोपरगांव, संगमनेर, राहाता तालुक्यातील पक्षाचे पदाधीकाऱी व निळवंडे कृती समीतीचे सदस्यांची बैठक बुधवारी राहाता पाटबंधारे विभाग विश्राम गृहावर प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस साई संस्थांनचे विश्वस्त सचिन तांबे, जिल्हा परिषद गटनेते जालींदर वाकचौरे, जिल्हा संघटक प्रकाश चित्ते, सरचिटनीस नितीन कापसे, राहाता तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, संजय सोमवंशी, काशिनाथ पावसे, सुभाष गिते, राजेंद्र दंडवते, संदिप गमे, बाबुराव लोंढे, बंडोपंत खापटे, सुनिल लोंढे, आदी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना प्रा. बेरड म्हणाले पिढ्यान पिढ्या निळवंडेच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी निळवंड्याच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. ही प्रतिक्षा आता संपनार असून लवकरच निळवंड्याचे पाणी लाभ क्षेत्रातील लोकांना मिळेल. या कामाला गती देण्यासाठी सरकारने पावले उचलली असुन साईबाबा संस्थानने निळवंडेच्या कामासाठी 500 कोटी रूपये देऊ केलेल्या निधीच्या माध्यमातून धरणाचे रखडलेले कालवे व चार्‍यांचे काम सुरू केले जाणार आहे.
या कामाचा शुभारंभ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे प्रा. बेरड यांनी सांगीतले. सचिन तांबे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने साईबाबा संस्थानने निळवंडेच्या कालव्यांच्या कामासाठी पाचशे कोटींचा निधी दिला. कालव्यांचे व चार्‍यांचे काम पुर्ण होईल तसा हा निधी वर्ग केला जाईल. एकाच वेळी पुर्ण निधी दिला जाणार नाहीे. यावेळी प्रकाश चित्ते, जालींदर वाकचौरे यांची भाषणे झाली.

 

LEAVE A REPLY

*