अमिताभ बच्चन यांनी जीएसटीचा प्रचार करु नये : संजय निरुपम

0

जीएसटीच्या प्रमोशनसाठी केंद्र सरकारने अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे.

वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जूलैपासून होणार असून जीएसटीच्या प्रचारासाठी केंद्र सरकारने अमिताभ बच्चन यांची मदत घेतली आहे.

मात्र यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी जीएसटीचा प्रचार करु नये, त्यांनी जाहिरातीतून माघार घेतली नाही तर व्यापाऱ्यांमधील नाराजीचा फटका त्यांना बसेल असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

जीएसटीसाठी अर्थ मंत्रालयाने ४० सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला होता.

‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं होते.

या व्हिडीओत अमिताभ बच्चन झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मला यासंदर्भात विचारणा झाली होती.

कररचनेविषयी सर्वसामान्यांना माहिती द्यायची होती. त्यामुळे मी यासाठी होकार दिला असे बच्चन यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

*