अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार!

0

अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

‘अमर अकबर अँथनी’, ‘अजूबा’ आणि ‘नसीब’ यांसारखे हिट चित्रपट दिल्यानंतर ही जोडी आता ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

चित्रपटाची खास बाब म्हणजे यात अमिताभ हे ऋषीजींच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

रोमॅण्टिक विनोदीपट असलेल्या ‘१०२ नॉट आउट’ चित्रपटात अमिताभ १०२ वर्षांचे तर ऋषी ७५ वर्षांचे दाखविण्यात येणार आहेत. सौम्या जोशीच्या याच नावाच्या गुजराती नाटकावर चित्रपटाची कथा आधारित आहे.

वडील-मुलामधील प्रेमळ आणि खोडकर नाते यातून उलगडण्यात येणार आहे. चित्रीकरणाला सुरुवात होताच या नटखट पिता-पुत्राच्या जोडीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*