अमिताभ आणि जया बच्चन पुन्हा एकदा एकत्र झळकणार!

0

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन  हे आयकॉनी कपल लवकरच पडद्यावर एकमेकांसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत.

निर्माता सुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटात हे कपल एकत्र बघावयास मिळणार आहे.

‘पिंक’नंतर सुजित सरकार नव्या चित्रपटाची तयारी करीत आहेत.

त्यांच्या आगामी चित्रपटाची कथा विवाहित असलेल्या ४० वर्षांच्या एका जोडप्याची आहे.

वयोवृद्ध असतानाही त्यांच्यातील प्रेम हे कायम असल्याचे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. अमिताभ आणि जया यांची जोडी या कथेसाठी अगदी योग्य असल्याने, त्यांची नावे निश्चित समजली जात आहेत.

LEAVE A REPLY

*