अमळनेर येथे २८ रोजी हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा

0

अमळनेर |  प्रतिनिधी :  दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा अमळनेर शहरातून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था, राष्ट्रप्रेमी व विविध मंडळांच्या सहकार्याने चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुडीपाडवा) शके १९३९ दि.२८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा निघणार आहे.

या शोभायात्रेचा प्रारंभ प्रताप मिल पासून स्टेशन रॉड,स्वामीनारायण चौक,सुभाष चौक,राणी लक्ष्मीबाई चौक, सराङ्ग बाजार, वाडी चौक, माळी वाडा, झामी चौक,पवन चौक, कुंटे रॉड, बसस्टँड, विजय मारोती मंदिरमार्गे डाक बंगला(जि.प.विश्राम गृह) येथे समारोप होणार आहे.

नववर्ष स्वागत यात्रेचे हे १३ वे वर्ष असून दरवर्षी यात्रेचा प्रतिसाद वाढत आहे. शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळ आपले चित्ररथासह या यात्रेत सहभागी होत असतात.यात्रामार्गावर रांगोळ्या काढून स्वागत केले जाते. तर काही मंडळांकडून पिण्याचे पाणी,सरबत वाटप करण्यात येते.

या शोभायात्रेत शहरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा समिती कडून करण्यात आले आहे. या नववर्ष स्वागत शोभायात्रेची तयारीसाठी दि. २६ मार्च ला रात्री ८ वाजेला प्रताप मिल मधील मंगलकार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी शहरातील सर्व समितीतील सदस्य, धर्मप्रेमी, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, संस्था व गणेश-नवदुर्गा मंडळाच्या प्रमुख व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही समितीतर्ङ्गे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*