अमळनेर पालिकेचा शिलकी अर्थसंकल्प

0

अमळनेर, |  प्रतिनिधी :  शहरातील आजी माजी सैनिकांचा मालमत्ता कर माङ्ग करून सर्वसामान्य जनतेवर घरपट्टी व पाणीपट्टीची कूठलीही करवाढ न करता पालीकेचे उत्पन्न वाढीचे दृष्टिकोण डोळ्यासमोर ठेवून सुमारे १८ लाख २२ हजार रुपये शिलकिचा ४९ कोटी ८७ लाख ७७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. पूष्पलता पाटील यांनी पालीका सभागृहात सादर केला.

या आर्थिक वर्षात कूठल्याही करात खरेदी मूल्यांशिवाय वाढ न सूचविणारा असल्याचा दावा सौ. पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, मूख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी केला आहे.

लोकनियूक्त नगराध्यक्षा सौ. पूष्पलता पाटील व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा हा पहिलाच अर्थसंकल्प पालीकेत मांडला गेला. महसूली व भांडवली जमा खर्चाचे प्रारंभिक व अंतिम शिलकेसह १३०कोटी १२लाख हे अंदाजपत्रकात विशेष तरतूदींचा समावेश आहे त्यात भूयारी गटारीच्या ६६ कोटी ७५ लाख रूपयांच्या या योजनेला शासन मंजूरी मिळाली असल्याने हि योजना विद्यूतगतिने राबविण्यासाठी ३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हगणदारी मूक्तीसाठी विशेष भर देण्यात येवून विज रस्ते स्वच्छता आरोग्य व इतर सुविधांसाठी देखील निधिंची तरतूद करण्यात आली आहे यात दलीत वस्तीतील कामे मटन मार्केट, खळेश्वर महादेव मंदिराजवळ व ढेकू पिंपळे रोड साठी स्मशान भूमी, तसेच शहरात स्विमिंग टँक व्यायाम शाळा, ग्रंथालय, वाचनालय वअभ्यासिका इमारत ऊभारणे.

खूल्या भूखंडावर बगीचे विकसित करणे यासह शहरातील ठिकठिकाणी पार्कींग झोनची निर्मिती करून रिक्षा व टँक्सीसाठी थांबा निर्मिती, आदर्श ङ्गेरीवाला धोरणानूसार ढेकूरोड, बोरसे नगर, आर के नगर , विद्या विकार कॉलनी, पैलाड या भागात खूल्या जागेवर भाजीपाला ङ्गळे विक्रेत्यांसाठी जागा ऊपलब्ध करून देणे तसेच शहरातील विविध भागातील अतिक्रमित जागेवरील ३९६५ अतिक्रमण धारकांना घरकूल योजने अंतर्गत घरकूलाचा लाभ देणे, ङ्गायनल प्लँट ७७/७८वसि. स. नं.  ३०३९याजागेवर १०७दूकानांचे व ङ्गा. प्लॉ. नं. १२३ च्या जागेवर ३६० गाळ्यांचे भव्य तिन मजली व्यापारी संकूल ऊभारणे.

यात रहदारीच्या मूल्य रस्त्यांवरिल अतिक्रमण धारकांना  लाभ मिळवून देणे पालीका कर्मचार्‍यांचे वेतन व सेवा निवृत्ती धारकांचे मासिक वेतन नियमित करणे व शासनाच्या निर्देशानूसार सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत तरतूद अर्थ संकल्पात करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पूष्पलता पाटील यांनी दिली . या अंदाजपत्रक सादर करण्याच्या सभेला आघाडीचे सर्व नगरसेवक ऊपस्थित होते.

शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी नूकत्याच पार पडलेल्या पालीका निवडणूकीत जनतेला दिलेल्या जाहिरनाम्यातील विकास कामांना येत्या आर्थीक वर्षात जास्त कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या आघाडीच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, सभापती व नगरसेवक कटीबध्द असून पालीकेचा हा अर्थसंकल्प सामान्यांना दिलासा देणारा असल्याचे  माजी आ. साहेबराव पाटील व रामभाऊ संदानशिव व आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

*