अमळनेरच्या नगराध्यक्षांसह २२ नगरसेवकांच्या अपात्रतेचा निकाल २ आठवडयात दया : खंडपीठाचे राज्य मंत्र्यांना आदेश

0

अमळनेर |   प्रतिनिधी  : येथील लोकनियुक्त नगराध्यक्षांसह २२ नगरसोवकांचे अपात्रते प्रकरणी नगरविकास राज्यमंत्र्यांनी २ आठवड्यात निकाल द्यावा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.आर एम बोर्डे व न्या.ए एम डवले यांनी आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांना दिले आहे .

या बाबत अौरंगाबाद ऊच्च न्यायालयात रिट याचिका आ शिरिष दादा चौधरी गटाचे गटनेते बबली पाठक यांनी (क्र.१७४७१/२०१८) दाखल केली होती या अन्वये मान. राज्यमंत्री श्री रणजित पाटील यांना आदेशीत केले आहे अमळनेर येथील लोकनियुक्त नगराधक्ष्या सौ पुष्पलता साहेबराव पाटील व 22 नगरसेवकांनी मागील वर्षी १७एप्रील २०१७ रोजी शहरातील काढण्यात येणारे अतिक्रमण मोहिमेला स्थगिती देण्याचा ठराव १५ एप्रील २०१७ चे बैठकीत केला हा ठराव बेकायदेशीर असून नगराध्यक्षा व त्या ठरावाला मंंजूरी देणारे २२नगरसेवक अपात्र ठरतात, अशी तक्रार चौधरी गटाने १२जून २०१७रोजी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती.

यावर दोन्ही बाजूचे म्हणणे एैकून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दि २९ जानेवारी २०१८रोजी अपात्र ठरवित निकाल दिला होता. त्यावर दूसऱ्याच दिवशी ३१जानेवारी ला नगरविकास राज्यमंत्रींनी स्थगिती आदेश दिले होते. या प्रकरणी ऊच्च न्यायालयात चौधरी गटाने याचीका दाखल करून राज्यमंत्रींनी लवकर निकाल द्यावा अशी मागणी केली होती . त्यावर आज सूनावणी होवून 2 आठवड्यात निर्णय घ्या,असे आदेशीत केले आहे .

सदर प्रकरण हे  जिल्हाधिकारी यांनी अपात्र केल्यानंतर राज्यमंत्री यांनी स्थगिती दिलेली होती व 20 फेब्रुवारी 2018 रोजी अंतिम सुनावणी होऊन देखील निकाल राज्यमंत्री देत नव्हते . म्हणून अर्जदार  प्रवीण शशिकांत पाठक वगैरे यांनी औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती.

अर्जदार तर्फे अँड. विनायक दीक्षित ,अँड.अंकुश पाटील व अँड. सुरेश सोनवणे यांनी काम पाहिले.  आता नगराध्यक्षांसह २२नगरसेवकांच्या अपात्रतेचा चेंडू पून्हा एकदा राजकीय गोटात गेल्याने दोन्ही गटाकडून राजकीय शक्ती पणाला लागणार आहे ४ एप्रील पासून पावसाळी अधिवेशन सूरू होत आहे त्या दरम्यानच राज्यमंत्रींना यावर निर्णय द्यावा लागणार आहे
माहिती याचीका कर्ते नगरसेवक बबली पाठक यांनी दिली

LEAVE A REPLY

*