अमरनाथ हल्ल्याचा निषेध : पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेना, राष्ट्रवादीचे आंदोलन

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आज मंगळवारी सकाळी नगर शहरात पुतळा जाळून निषेध केला.
भिंगारवाला चौकात सेनेने पाकचा पुतळा जाळून निषेध केला. शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली सेनेने हे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, विक्रम राठोड, गणेश कवडे, संजय चोपडा, संतोष ग्यानप्पा, लंकेश हारबा, दिपक खैरे, सुरेश तिवारी, वैभव सुरवसे, दिंगबर ढवण, आशा निंबाळकर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
चितळे रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, माजी महापौर तथा नगरसेवक अभिषेक कळमकर, संजय झिंजे, ऋषी ताठे, अजय चितळे, साहेबान जहागीरदार,प्रा.अरविंद शिंदे, दिपक सुळ, अमित खामकर, महावीर भंडारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या. सरकारने तातडीने तातडीने कारवाई करावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

LEAVE A REPLY

*