अमरज्योत हॉटेलवर छापा; माजी नगरसेवकासह 42 जणांना अटक

0

60 लाखांचा मुद्देमाल जप्त; अक्षय शिंदे यांची कामगिरी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर- कल्याण रोडवरील हॉटेल अमरज्योत येथे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय शिंदे यांनी जुगार आड्ड्यावर छपा टाकला. यात रोख सहा लाख तर 52 लाख 55 हजार रुपयांच्या अन्य साहित्यांसह 60 लाखांच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी एक माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवीकेच्या पतीसह 42 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
माजी नगरसेवक राजेंद्र रामनारायण राठोड (ठाकुरगल्ली तोफखाना), गणेश होळकर (नेप्ती), संजय बुलाखे (रा. कॉटेज कॉर्नर), राकेश अजबे (आष्टी), नरेश भुमकर (आगरकर मळा), अशोक बेल्हेकर (नेप्ती),संतोष ताराचंद्र साखला (भुषणनगर), अशोक लढ्ढा (रा. आडते बाजार), संजय बुलाखे (रा. कॉटेज कॉर्नर), गणेश चोभे (रा. बाभुर्डी बेंद), पोपट मोरे (रा. नेप्ती), सतीष होळकर (नेप्ती), मनिकांत सिंग (पुणे), मच्छिंद्र चोभे (वाकोडी), चंद्रशेखर रोकडे (कुर्हाडेमळा), चंद्रशेखर रकडे (बुरूडेमळा), सचिन काळे (निमगाव वाघा), शिवाजी बेलेकर (नेप्ती), सागर सुरेश शिंदे (वैदुवाडी), दिगंबर नवले (नामदेव नगर), सुधीर राऊत, जितेंद्र राऊत, मुकेश शाहु, राकेश कश्यप, पवन राम, (हॉटेल कामगार), सुनिल गोरे (केडगाव) जालिंदर नवले (शाहु नगर), कैलास लष्करे (नेवासा), मोहन कुदाडे (श्रीगोंदा), संतोष कुमकर (आष्टी), वसंत वडे (येवला), गजानन काळे (राशीन), संतोेष भुसा (ठाकुर गल्ली), गोटीराम अजबे (आष्टी), भाऊसाहेब शिंदे (नेप्ती) गणेश पालवे (नेवासा), पोपट घुले (आष्टी), अंगद पडोळे, संजय जेधे, नाना कुमकर (आष्टी), रामदेव शेंडे, जालिंदर आहेर (औरंगाबाद) अशी 24 जणांची नावे आहेत.

 
आरोपी हे शुक्रवारी (दि.26) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नगर तालुक्यातील हॉटेल अमरज्योत येथे जुगार खेळत असल्याची माहीत सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा व अप्पर पोलीस अधिक्षक घनश्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांचा ताफा घेऊन या हॉटेलवर छापा टाकला. त्यात रोख सहा लाखापेक्षा जास्त रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

 

तसेच चारचाकी कार व अन्य जुगारांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहेत. शिंदे यांनी छापा टाकल्यानंतर काही आरोपींची पळापळ झाली. प्रतिष्ठेचा प्रश्‍न असल्यामुळे अनेकांनी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी नुकताच कार्यभार हाती घेतल्यामुळे त्यांनी कोणाशी बोलणे तसेच कोणालाही अभय देणे टाळले. त्यामुळे माजी नगरसेवक व अन्य प्रतिष्ठीत व्यक्ती पोलिसांना सरेंडर झाले. रात्री 9 वाजता सर्व आरोपींना नगर तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात करण्यात आले होते.

 

गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजकीय हस्तक्षेपाला थारा नाही
नगर शहरात जर अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील तर नागारिकांनी माझ्याशी संपर्क साधावा. कारवाईत कोणत्याही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप खपवुन घेतला जाणार नाही. मटका, जुगार, अवैध दारु विक्रीला शहरातून हद्दपार करण्यासाठी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे.
– अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक

 

 

यांनी केली कामगिरी
सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्यासह राजेंद्र भालसिंग, गणेश चव्हाण, रंगनाथ नरसाळे, युवराज गिरवले, सचिन जाधव, प्रमोद जरे, संतोष ओव्हळ, रविंद्र कर्डीले, विशेल दळवी, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, देविदास काळे यांनी ही कारवाई केली. शिंदे यांच्या नगरमधील कार्यकाळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

LEAVE A REPLY

*