अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

0

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे आज ( गुरुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

त्या 59 वर्षांच्या होत्या. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काल (बुधवारी) छातीत दुखत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या गेल्या. त्यांच्या निधनाने च‍ित्रपट आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

ओशिवरा स्मशान भूमीत दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*