अभिनेत्री कंगना राणौतच्या घरी येणार नवा पाहुणा

0

अभिनेत्री कंगना राणौतच्या रिअल लाईफमध्ये एका नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे.

अर्थात कंगना लवकरच मावशी बनणार आहे. कंगनाची बहीण रंगोली प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली आहे.

या वर्षाच्या अखेरिस रंगोली आई होणार आहे. रंगोली व कंगना या दोघी बहिणी एकमेकींच्या अतिशय जवळ आहेत. त्यामुळे रंगोली आई होणार या बातमीने कंगनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कंगनाने स्वत: मीडियासमक्ष या बातमीला दुजोरा दिला. प्रियांका चोप्राच्या पार्टीत पोहोचली तेव्हा तिने ही गोड बातमी सगळ्यांशी शेअर केली होती.

हे बाळ आमच्या कुटुंबातील पहिले ग्रँडचाइल्ड असणार आहे. त्यामुळे माझ्यासोबत माझे कुटुंब आम्ही सगळेच अतिशय आनंदात आहोत. तूर्तास रंगोलीला बेड रेस्ट करण्यास सांगण्यात आले आहे, असे कंगनाने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*