अभिनेता झाएद खान आता छोट्या पडद्यावर नशीब अजमावणार!

0

अभिनेता झाएद खान बऱ्याच कालावधीपासून चित्रपटांपासून दूर आहे. ‘चित्रपटात यश मिळत नसल्याने झाएद बॉलिवूडपासून दूर गेला. अभिनयात विशेष अशी कामगिरी नसल्याने चित्रपटांची ऑफरसुद्धा त्याला मिळत नव्हती.  झाएद मोठ्या पडद्यावर यश न मिळाल्याने आता छोट्या पडद्याकडे वळला आहे.

लवकरच तो एका मालिकेमध्ये दिसेल. त्यामुळे स्वतःला प्रमोट करण्यासाठी झाएदचा खटाटोप सुरु असून, त्यासाठी त्याने इतरांप्रमाणे सोशल मीडियाचा आधार घेतला.

रोमॅण्टिक थ्रिलर असलेल्या ‘हासिल’ मालिकेतून झाएद टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करतोय. निर्माता-दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा याच्या मालिकेमध्ये तो एका व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसेल.

त्याच्यासोबत या मालिकेत वत्सल सेठ आणि निकिता दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

*