अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजदूताच्या घराजवळ रॉकेट कोसळले

0

अफगाणिस्तानची राजधानी अससेल्या काबूलमधील वोहरा यांच्या निवासस्थानाजवळ रॉकेट कोसळल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

या भागात राजदूत मनप्रीत वोहरा यांच्यासह दूतावासातील इतर कर्मचारीदेखील वास्तव्याला आहेत.

रॉकेट कोसळल्याने कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.

मागील आठवड्यात काबूलमध्ये मोठा स्फोट झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर काबूल शहरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही भारतीय राजदूताच्या निवासस्थानाजवळ रॉकेट कोसळले. ही घटना दहशतवादी हल्ल्याचा भाग होती का, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही.

LEAVE A REPLY

*