अपात्रतेच्या भितीने सत्ताधार्‍यांचे मानसिक संतुलन खराब – चौधरी

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  विश्रामगृह परिसरातील संबंधित बाकड्यावर टाकण्यात आलेले नाव ही योग्य बाब नसल्याने अभियंता कुरेशी यांना पूर्वीही सुचित केले होते. मात्र त्यांनी नाव खोडले नाही. हीच बाब रात्री पुन्हा त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण आपण बाकावरील नाव पुसलेले नाही.

आगामी तीन महिन्यात पालिकेच्या सत्ताधार्‍यांची अपात्रता समोर पाहून त्यांची मानसिक स्थिती खराब झाल्याने व कुरेशी व आमदार यांचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याने आपल्यावर असे आरोप करण्यात येत असल्याचे  माजी आ. संतोष चौधरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

शनीपेठ वार्डातील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक जगन सोनवणे, जनआधारचे  गटनेता उल्हास पगारे, सचिन चौधरी, माजी नगरसेवक आशिक खान, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, कैलास बोरसे, नितीन धांडे, प्रदीप पाटील उपस्थित होते.

अशाप्रकारे एखाद्या वस्तूवर आपले नाव टाकण्यासाठी ती खाजगी मालमत्ता नाही. शासकीय मालमत्तेवर असे नाव टाकता येत नसल्याने आपण या प्रकाराला विरोध केला आहे. कुरेशी यांची मागील व चालू काळातील  भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडणार आहे. तसेच कालच नाशिक विभागीय ऍटीकरप्शन विभागाकडे तक्रार दिली असल्याने कुरेशी आपल्यावर आरोप करत आहे.

तेथे  लघुशंका करण्याचा संबंध नाही हा आरोप खोटा आहे. अभियंता कुरेशी व  आ. सावकारे  सा.बां. विभागात मोठा भ्रष्टाचार करीत आहे. कुरेशी आपल्या मुलाच्या नावावर मोठ मोठे ठेके घेत आहे. त्याचे एमबी रेकॉर्ड ते स्वत:च तयार करत आहे.

शहरातील कुरेशी हॉल खाजगी जागेवर असून यासाठी लोकवर्गणी घेण्यात आली आहे. मात्र तेथे आमदार  फंडाचा उपयोग कुरेशी यांनी केला असल्याने तो अपहार आहे. हे अपहार बाहेर येणार असल्याने हे आरोप होत आहे. कुरेशी यांच्या परिवाराच्या संपत्तीची चौकशीची मागणी ऍन्टीकरप्शन विभागाकडे करण्यात आली आहे.

कोणत्याही खोट्या दबावामुळे चौकशी थांबणार नसल्याचे माजी आ.चौधरी यांनी सांगितले. भाजपाचे नगरसेवक अपात्रतेच्या भितीने धस्तावलेले आहे.

त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर आरोप करण्यात आले आहे. आगामी ९० दिवसात संपूर्ण २७ नगरसेवक अपात्र होणार असल्याने त्यांचे मानसिक संतुलन खराब झाले आहे म्हणून असे प्रकार ते करीत असल्याचे माजी आ.चौधरी यांनी केला. याबाबत कुरेशी यांच्या कार्यालयासमोर विविध दहा संघटनांतर्ङ्गे भ्रष्टाचार पर्दापाश आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*