अपहरणावरुन मुकुंदनगरमध्ये राडा

0

मुकुंदनगरकरांविरोधात विनयभंग दरोड्याचा गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुलांच्या अपहरणाच्या संशयातून मुकुंदनगर येथे उद्योगपती कांकरिया यांच्या कुटुंबातील महिलांसह तिघांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कांकरिया यांचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही गहाळ झाले आहेत. मुकुंदनगरच्या या प्रकरणात दोन परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
कांकरिया यांच्या विरोधात अपहरणाचा तर मुकुंदनगरच्या गटाविरोधात दरोड्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे.
साधना सत्यम कांकरिया, स्नेहा सत्यम कांकरिया, सत्यम सुरेश कांकरिया असे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या कांकरिया कुटुंबातील तिघांची नावे आहेत. दोन अल्पवीयन मुलांना किडनी काढण्याच्या उद्देशाने गाडीत बसूवन पळवून घेवून जात असल्याची तक्रार राजू राय मोहमंद ( रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी साधना सत्यम कांकरिया,स्नेहा सत्यम कांकरिया, सत्यम सुरेश कांकरिया यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
साधना सत्यम कांकरिया यांनीही स्वतंत्रपणे पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सँनीटरी नँपकिन खेरदी करण्यासाठी मुकुंदनगर येथे गेले होते. दुकान दाखवण्यासाठी मुलांना गाडीत बसवले. मुलांना किडनॅप करणारी टोळी असल्याच्या संशयावरून ारोपींनी शिवगाळ दमदाटी करून मारहाण केली. या मारहाणीत हिरेजडीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्यचा चैन तसेच अंगठी असा 2 लाख 40 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याचे कांकरिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार राजु राय महंमद खान, सरफराज सय्यद जहागिरदार, साहील पिरजोद, महंमद सरफराज जहागिरदार, आशपाक खान, काळया शेख, आयज शेख व इतर 40 ते 50 अनोळखी जमावा विरूध्द पोलिसांनी विनयभंग, दरोडा, शिवीगाळ करून मारहाण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*