Type to search

धुळे

अपघाताचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी रात्रीतून बुजले खड्डे

Share

मुकटी । धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळील कोंडी नाल्यावर खड्डे पडल्याने वाहन चालविणे जिकरीचे झाले होते. अखेर ग्रामस्थांच्या पुढाकारातुन रात्री दहा वाजेच्या सुमारास खड्डे बुजविण्यात आलेत. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याने धुळे- नागपूर महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. दरम्यान मोठ मोठ खड्डे बुजविणार्‍या तरूणांच्या कामाचे कौतूक होत आहे.

धुळे नागपूर महामार्गावर मोठ मोठे खड्डे असल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. खड्ड्यामुळे प्रवासी रिक्षा नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले होते. मात्र या खड्डयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. अखेर गावातील काही तरुण रिक्षा चालकांनी पुढाकार घेत रात्री 10 वाजेच्या सुमारास खड्डे बुजविण्यात प्रारंभ केला. या कामामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे खड्डे बुजविणार्‍या सर्वच तरुणांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!