अपक्षांची आघाडीही निवडणुकीच्या मैदानात

0

कलावती शेळके यांनी घेतला अर्ज, सुवर्णा जाधव यांचा श्रावण मुर्हूत

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अपक्ष आघाडीच्या कलावती शेळके यांनी महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज घेतल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान मनसेच्या सुवर्णा जाधव यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज घेतला. पहिल्या दिवशीही एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रावणाचा मुर्हूत शोधला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अपक्ष आघाडीच्या कलावती शेळके यांनी महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज घेतल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान मनसेच्या सुवर्णा जाधव यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज घेतला. पहिल्या दिवशीही एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्रावणाचा मुर्हूत शोधला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 25 जुलै रोजी स्थायी आणि महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी विशेष सभा होत आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभय महाजन यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. आज उमेदवारी अर्ज वितरणाचा पहिलाच दिवस होता. शुक्रवारी व सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत आहे.

सुवर्णा जाधव या युतीच्या स्थायी समिती सभापती पदाच्या उमेदवार असणार आहे. युतीत त्यावर शिक्कामोर्तब झाले असून विरोधकांनी उमेदवार न दिल्यास त्या बिनविरोध होतील. त्या बिनविरोध होऊ नये यासाठी अपक्षांच्या गटाने जोरदार फिल्डींग लावली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सारिका भूतकर या आग्रही असल्या तरी छाया तिवारी व सुनीता मुदगल या सेना नगरसेविकांनीही तयारी सुरू केली आहे. युतीत या समितीच्या सभापती, उपसभापतीच्या नावाचा गोंधळ सुरू असतानाच आज कलावती शेळके या अपक्ष आघाडीच्या नगरसेविकेने अर्ज घेतल्याने चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

LEAVE A REPLY

*