अपंग प्रमाणपत्राची पडताळणी करणार

0

अशोक कडूस : 47 शिक्षकांना मणका विकार 

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे 47 मणके विकाराने पिडीत शिक्षकांचे अर्ज आलेले आहेत. या शिक्षकांची शारिरिक तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. तसेच गरज वाटल्या अपंग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 
नगर जिल्हा परिषदे यापूर्वी काही वर्षापूर्वी 76 शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केले होते. मात्र, त्यावेळी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले होते. यामुळे यंदा देखील शंका आल्यास अपंगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येईल, असे कडूस यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी राज्य सरकारपातळीवर आदेश काढण्यात आले आहेत. यात मणके विकाराने ग्रस्त असणार्‍या शिक्षकांना बदलीत सवलत देण्यात आलेली आहे. यामुळे 47 शिक्षकांनी मणके विकाराने पिडीत असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर केले आहे.

 
नगरच्या जिल्हा रुग्णालयात मणके तपासणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा नसल्याने पुण्याला या शिक्षकाला पाठवण्यात येणार असल्याचे कडूस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*