…अन भादली गाव सुन्न झाले !

0

जळगाव (राजेंद्र पाटील) : येथून जवळच असलेल्या भादली येथे एकाच कुटूंबातील चौघांचा निघृण हत्या झाल्याची घटना आज दि.२० रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. एकाचवेळी संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त झाल्याने भादली गावात सर्वत्र शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस विभागाने घटनास्थळी असलेली परिसस्थती लक्षात घेत घरात कुणालाही जाऊ न देता तपास सुत्रे हाती घेतले.

प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), त्यांची पत्नी संगीता सुरेश भोळे (वय ३५), मुलगी दिव्या (वय ६), मुलगा चेतन (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील चौघांची हत्या होणे ही घटना जिल्ह्यासाठी मोठी तर तपासाकामी पोलिसांना आवाहनात्मक ठरली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, भुसावळ विभागीय अधिकारी श्री.निलोत्पल, एलसीबीचे श्री.चंदेल, श्री.धारबडे यांचेसह ङ्गिंगरप्रिंट तज्ज्ञ आदींचा ताङ्गा भादली गावात दाखल झाला. काल रात्री १० वाजेपर्यंत सर्वांशी बोलत असलेल्या व्यक्तीचे पूर्ण कुटूंबचे कुटूंब मृत्यूमुखी झाल्याची घटना माहित पडताच गावातील सर्व ग्रामस्थ त्या घराच्या दिशेने बघण्यासाठी धाव घेत होते.

अलका भोळेंमुळे झाली चर्चा

हत्या झालेल्या घरासमोर दिनकर लक्ष्मण भोळे यांचे घर असून त्यांच्या पत्नी अलका भोळे यांना समोरील घरात मोबाईल वाजत असल्याचा आवाज येत होता तर घर बंद असून घरात कुणाचाही आवाज येत नाही.

DSC07418

.. सकाळी शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जातांना का दिसत नाही… काय झाले… कुठे गेले… अशी शंका येत अलका भोळे यांनी समोरील घराचा दरवाजा लोटला… दरवाजा उघडताक्षणी घरात चारी जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे चित्र दिसून आले. हे दृश्य बघून अलकाबाई यांना धक्काच बसला व त्यांनी आरडाओरड करत गल्लीतील लोकांना आरोळ्या मारल्या व बघता बघता काही क्षणात घटनेचे वृत्त संपूर्ण गावात पसरले.

deshdoot pathlag logo

कुटूंब नामशेष

आई-वडील नसलेल्या तीन बहीणींचा एकूलता एक भाऊ असल्याने व प्रदीपसह त्याची पत्नी संगीता, मुलगी दिव्या, मुलगा चेतन यांचीही हत्या झाल्याने संपूर्ण कुटूंब संपले. आता प्रदीपला तीन बहिणींशिवाय कुणीही वारस नाही. प्रदीपच्या तीन बहिणींमध्ये सुनीता किशोर नारखेडे (साळवा), अनिता राजेंद्र पाटील (कडगाव), संगीता सुरेश सावदेकर (आसोदा) याठिकाणी आहेत.

अन् बहीणींनी ङ्गोडला हंबरडा

भादली येथील भाऊ प्रदीप व वहीणी, भाचा, भाची यांचा खून झाल्याचे वृत्त बहीणींना कळताच प्रदीपच्या बहीणींनी भादलीचा मार्ग धरला व सकाळी आठ-नऊ वाजेच्या सुमारास दोन बहीणी पोहचल्या. एकूलता एक भाऊ गेल्याने व त्याच्या कुटूंबातील कुणीही न राहील्याने बहीणींनी हंबरडा ङ्गोडत आक्रोश सुरू केला.

आता आमचा माहेरचा रस्ता बंद झाला… आता कुणाला भाऊ म्हणू, आमची मुले कुणाला मामा-मामी म्हणतील… आम्हाला कोण आत्या म्हणेल असा आक्रोश बहीणींनी सुरू केला अन् ते दृश्य बघणार्‍यांच्या नयनी अश्रृंच्या धारा वाहू लागल्या.

दोन दिवसांनी होते हॉटेलचे उद्घाटन

भादली गावातील लेवा पंच मंडळाच्या इमारतीच्या गच्चीवर प्रदीप भोळे याने ‘श्रध्दा चायनिज’ ची हॉटेल सुरू केली होती. या हॉटेलचे उद्घाटन एक-दोन दिवसात होणार होते. प्रदीप हा उत्तम स्वयंपाकी होता, त्याने अनेक हॉटेलींवर स्वयंपाक बनविण्याचे काम केले होते. आता तो स्वत:ची हॉटेल चालविणार होता. त्या हॉटेलवर जालणा येथील एक वयोवृध्द मजूर ठेवलेला होता.

तो रात्री काम आटोपल्यानंतर गच्चीवरील हॉटेलवरच झोपला व हॉटेलच्या मार्गावरील दरवाजा बंद करून चावी घेवून प्रदीप घरी आलेला होता. हॉटेलात काम करणारा मजूर पहाटे दरवाजा न उघडल्याने तो वरच अडकलेला होता. पोलीसांनी दरवाजा उघडून त्यास खाली उतरविले.

दोन दिवसांनी होती शेतीची खरेदी

प्रदीपच्या मालकीचे भोलाणे रस्त्यावर अडीच-तीन एकर शेत होते. ते शेत विकले असून त्याची कच्ची चौदा पावती झालेली होती. त्यास आतापर्यंत ८५ हजार रूपये दिले होते व दोन दिवसात पक्की खरेदी होणार असल्याचे शेत खरेदी करणारे महेश पाटील यांनी माहिती दिली.

 

प्रदीपचा वाद नव्हता

प्रदीप गरीब स्वभावाचा, उत्तम स्वयंपाक कारागीर, मेहनती, सर्वांशी बोलणारा, मिळून मिसळून राहणारा होता असे तेथील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून ऐकण्यास मिळाले. मात्र असे का घडले? हा प्रश्‍न मात्र विवंचनेत टाकणारा आहे.

दरोडा नाही तर ङ्गक्त हत्या

चौघांची हत्या झाली, त्याठिकाणी कोणतीही वस्तू, दागीने, पैसे असे काही न गेल्याचे समजते. घर अतिशय मोळकडीस आलेले, घराचा दरवाजाही ङ्गक्त लोटलेल्या अवस्थेत तर मग हा दरोडा कसा असेल हा तर ङ्गक्त खूनच म्हणावा लागेल.

चौघांपैकी कुणीच ओरडले नसेल का?

घरात चार लोकांची हत्या केली जाते, घरासमोर पाच-सहा ङ्गूट अंतरावर घर, शेजारी राहती घरे मात्र या चारही आत्म्यांची हाक कुणाच्या कानी पडली नसेल का? कुणीच काही बोलत नाही, माहीत नाही, ऐकूच आले नाही असे उत्तरे देत प्रत्येक जण निसटता पाय घेत होते. आता उरला ङ्गक्त पोलीस तपास.. अन् पोलीस तपासच…

लहान लेकरांचा काय दोष

मुले ही देवाघरची ङ्गुले असतात असे म्हटले जाते. त्यांना जगातील चांगल्या वाईट टघटनेची जाणीवही नसते. हे कुटूंब संपवण्यामागे कारण काहीही असेल ते समोर येईलच.

Untitled-5

 

परंतु आई-वडीलासह सहा वर्षाची मुलगी दिव्या व चार वर्षाचा मुलगा प्रदीप यांन कुणाचे काय बिघडविले? त्यांचा काय दोष? हा प्रश्‍न सर्वांनाच हेलावून टाकणारा आहे. कुटूंबातील मोठी व्यक्ती मारले गेले याचे दु:ख तर आहेच. मात्र लहान बालकांचा जिव का घेतला हा प्रश्‍न सर्वांनाचा धक्का देणारा आहे.

लोकप्रतिनिधींच्या भेटी

एकाचवेळी एकाच कुटूंबातील सर्व सदस्य मारले गेल्याची घटना माहित पडल्यानंतर असं कुणीही नसेल की त्याला दु:ख होणार नाही व बघीतल्या शिवाय राहवले जाणार नाही. त्यामुळे भादली गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर लोकप्रतिनिधींमध्ये नुकतेच निवडून आलेले नशिराबाद-भादली गटाचे जि.प.सदस्य लालचंद पाटील, माजी सभापती विजय नारखेडे, पं.स.सभाती यमुनाबाई रोटे, पं.स.सदस्य जागृती चौधरी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन आदींनी भेटी दिल्या.

गावाच्या चहोबाजूंनी पोलीस

भादली येथील निर्दयीपणे झालेल्या चौघांच्या खुणाचा मेसेज नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी वरीष्ठांना कळवताच जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांनी याठिकाणी हजेरी लावत तपास सुत्रे वेगात सुरू केले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेतांना जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले.

त्यांचे सोबत पोलीस कर्मचारीही दिले. जिल्हा पोलीस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकार्‍यांनी घराचा परिसर, गावातील कानेकोपरे पिंजून काढले. मात्र सद्यस्थितीत पोलीसांना काहीच हाती लागलेले नाही.

पोलीसांपुढे आव्हान

नशिराबाद पोलीस ठाणे नुकतेच चांगल्या कामगीरीमुळे ‘आयएसओ’ झाले. हा आनंद व्यक्त होत असतांनाच पोलीस ठाणे हद्दीतील भादली गावात चौघांचा खून झाल्याची निर्दयी घटना सर्वांचे हृदय हेलावून सोडणारी असून त्याचा तपास करणे आता पोलीसांपूढे एक आव्हाणच आहे.

LEAVE A REPLY

*