अनुजा साठे पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार; दोन सिनेमांचं सध्या शूटिंग सुरु

0

गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत.

आता याच कलाकारांच्या यादीत आणखी एक मराठमोळं नाव जोडलं गेले आहे. मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे.

तिच्या वाट्याला आणखी दोन बड्या बॅनर्सचे सिनेमा आलेत. तिच्या दोन सिनेमांचं सध्या शूटिंग सुरु आहे. या दोन्ही सिनेमात अनुजासह बॉलिवूडचे दिग्गज कलाकार काम करत आहेत.

अनुजाच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘रायता’ असून दुस-या सिनेमाचं नाव ‘परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण’ असं आहे.

या दोन्ही सिनेमात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते काम करत आहेत. ‘रायता’ या सिनेमात अनुजाला अभिनेता इरफान खानसह काम करण्याची संधी मिळाली आहे.

दुसरीकडे ‘परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमात अनुजा अभिनेता जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत.

विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. छोट्या पडद्यावरील पेशवा बाजीराव या मालिकेतही अनुजानं राधाबाई ही भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

*