अनुकंपाधारक करणार साखळी उपोषण

0

जळगाव । जिल्हा परिषदे अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये वर्ग ‘क’ व ‘ड’ श्रेणीमध्ये 2005 पासून समाविष्ट असून शासन निर्णयानुसार दरवर्षी रिक्त होणार्‍या पदानुसार भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही भरती प्रक्रिया करण्यात येत नसल्यामुळे दि.10 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अनुकंपाधारकांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येऊन अनुकंपाधारकांनी प्रशासनाला साकडे घातले. सन 2015 मध्ये शासनाच्या सुचनेनुसार गट ‘क’ व ‘ड’ च्या एकूण 128 पदांची भरती करण्यात आलेली नाही. हि अनुकंपा भरती सन 20016 मध्ये करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑगस्ट 2017 रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागातील अव्वर सचिव भरत पाटील यांच्या आदेशान्वये ऑगस्ट महिन्यात अनुकंपा धारकांची कागदोपत्री पडताळणी तसेच सप्टेंबर महिन्यात गटविकास अधिकारी यांच्याकडून गृहभेट चौकशी करण्यात येऊन इतर कार्यवाही पुर्ण झालेली आहे.

नियुक्ती देण्याच्या वेळेस मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या उपसचिवांकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरविले होते. दि.3 एप्रिल 2018 रोजी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. याला चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला असून भरती प्रक्रियेला चालढकल होत आहे. त्यामुळे दि.10 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत. याप्रसंगी मायादेवी चव्हाण, दिनेश देवराज, तुषार चौधरी, अमजद खान, चेतन कुरकुरे, सुनिल कोळी, ललित साबे, तन्वीर तडवी, दगा पाटील, भुषण पाटील, सागर सावळे, मनिष खैरनार, मनोज खैरनार, मनिष सोनार, भरत धांडे, असीम तडवी, जगदीश भदाणे, प्राजक्ता गायकवाड, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*