Type to search

ब्लॉग

अदृश्य अक्षरे

Share

प्रत्येक गुन्हेगार गुन्ह्याचा काही ना काही पुरावा मागे सोडून जातो. पण ते पुरावे नेहमीच डोळ्याला दिसतील असे नाही. न्याय सहाय्यक शास्त्र किंवा ऋेीशपीळल डलळशपलश हे अदृश्य पुरावे शोधायला आपल्याला मदत करतात. डोळ्यासमोर पण अदृश्य असलेल्या पुराव्यांना नजरेत आणायला काय केले जाते, ते या सदरातून आपण जाणून घेऊ.

रंगझेब अहेमद नावाचा 32 वर्षे वयाचा अल कायदाचा आतंकवादी जेव्हा ब्रिटनमध्ये पकडला गेला, तेव्हा त्याच्याकडे तीन डायर्‍या सापडल्या. त्यातील कोणताही मजकूर संशयास्पद नव्हता. मात्र, त्यामधील काही पाने मध्येच कोरी होती. शोधकर्त्यांना हे वगळे वाटले. तपास केल्यावर असे लक्षात आले की, त्या कोर्‍या कागदांवर अदृश्य होणार्‍या शाईने काही तरी लिहिले होते.

अदृश्य शाईने लिहिलेला मजकूर वाचण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते. ती केल्यावर, त्यामध्ये आतंकवादी संघटनांसाठी महत्त्वाची ठरेल, अशी माहिती सापडली. अदृश्य होणारी शाई ही संकल्पना काही नवीन नाही. सीआयए ही गुप्तचर संस्था स्वतः अशाप्रकारे गुप्त माहिती ठेवत असे.

पहिल्या महायुद्धात जर्मनीचे ब्रिटनमध्ये पेरलेले अमेरीकन गुप्तहेर अशा प्रकारे संपर्क साधत असत. जॉर्ज वॉक्स बेकन हा अमेरिकी पत्रकार म्हणून काम करणारा जर्मनीसाठी हेरगिरी करत असे. ब्रिटनमधून अमेरिकेत पत्रव्यवहार करत असताना तो अदृश्य शाई वापरत असे. महायुद्धाच्या काळात पत्रव्यवहारावर कडक नजर असे. त्याला कम्युनिकेशन सेन्सॉरशिप असे म्हटले जात.

बेकन जी शाई वापरायचा, ती लिहायला कशी वापरायची, हे त्याला माहीत होते. मात्र, ती वाचण्यासाठी काय करावे लागते, हे त्यालासुद्धा माहीत नव्हते. फ्रांस व ब्रिटन यांना हे कमालीच कोडे होते. अदृश्य शाई याविषयी जर्मनी व फ्रांस या देशांमध्ये जणू लढाई सुरू होती.

लिंबाच्या रसाने लिहिलेले पत्र मेणबत्तीवर धरताच स्पष्ट दिसू लागते. रासायनिक पदार्थ वापरुन शाई गायब केली जाऊ शकते व परत दृश्य केली जाऊ शकते. स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञान वापरून अदृश्य शाई शोधली जाऊ शकते.

जॉर्ज बेकन व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, मात्र त्याच्या ज्ञानाकडे बघता त्याला मृत्युदंडाऐवजी एक वर्ष कारावासाची शिक्षा झाली.

आज बाजारात अदृश्य होणार्‍या शाईचे पेन उपलब्ध आहेत. थर्मोलबाईल, म्हणजे उष्णतेने बदलणारे हे रसायन असते. दिसणारी शाई घर्षणामुळे अदृश्य होते. मात्र ती यूव्ही लाइटमध्ये दिसते. चेकवर अशा शाईने सही करून मग ती गायब केली जाते. असे अनेक प्रकार आजकाल बघायला मिळतात. अशावेळी तज्ञ आपल्याला अदृश्य पुरावे शोधायला मदत करू शकतात.
परेश चिटणीस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!