Type to search

जळगाव

अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Share

जळगाव । सावदा पोलीस स्टेशनला दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला मध्यप्रदेशातील खकनार तालुक्यातील जामन्या ढाबा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

महेंद्रसिंग फुध्या भिलाला वय 40 रा. जामन्या ढाबा, ता. खकनार, जि. बर्‍हाणपूर याच्याविरुध्द सावदा पोलीस स्टेशनला महिलेला पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित महेंद्रसिंग भिलाला हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. दरम्यान त्याच्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुषंगाने पोहेकॉ. नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, दिपक पाटील, मनोज दुसाने, प्रविण हिवराळे, किरण धगनर यांनी सापळा रचून जामन्या ढाबा ता. खकनार येथून महेंद्रसिंग फुध्या भिलाला याला ताब्यात घेवून सावदा पोलीसांच्या स्वाधीन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!