अडावदच्या भोंग-या बाजारात विविध वस्तुच्या खरेदीला उधाण

0
लोकगीतांच्या तालावर तरूणाई थिरकली
  अडावद ता चोपडा (वार्ताहर ) येथे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भोंग-या बाजार असल्याने हतनूर डाव्या कनाल शेजारी प्रमीला नगर व गजानन नगर येथिल रिकाम्या आवारात भोंग-या बाजाराच्या खरेदीसाठी आदीवासी बांधवांची गर्दी उसळली.
    भोंग-या बाजारात होळी साठी लागणाऱ्या विविध साहीत्याची खरेदी करण्यात आली. त्यात खोबरे,नारळ,दाळ्या,फुटाणे,गुळ,साखरेचे हार, कपडे,रंगीत कागद,रंग आदी तसेच खाद्य पदार्थात गुळाची जिलेबी,व तोंड लाल करण्यासाठी पानटप-यांवर पानांचा अधिक  खप झाला.
IMG_20170306_165039
भोंग-या बाजारात सामुहीक नृत्य
१०ते १२ आदीवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातील एका गावात भोंग-या बाजार भरवला जातो.प्रत्येक आदीवासी पाड्याचे मुखीया (पाटील)नदीकाठी एकत्र येऊन बाजार कोठे भरवायचा याबाबत निर्णय घेतात.
होळी सणा अगोदर  बाजाराचा दिवस ठरविला जातो.परिसरातील आदीवासी बांधव ढोल -पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला व गीत गायला येतात .त्यात सामुहीक नृत्य अधिक लक्षवेधी ठरते.
बाजारात पोलिस बंदोबस्त
आदीवासी बांधवांची उसळलेली गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अडावद पोलिस ठाण्यामार्फत सपोनि जयपाल हिरे ,पोउनि पंकज शिंदे ,संतोष पारधी, संदीप चतुर , मोहसीन पठाण, अकिलखान, फारुख तडवी, राजश्री बाविस्कर , प्रज्ञा ईंगळे तसेच गृहरक्षक दलाचे जवान आदींनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

LEAVE A REPLY

*