Type to search

जळगाव

अट्टल चोरट्याच्या घरातील फ्रीजमध्ये आढळले साडेसात लाखांचे दागिने

Share

जळगाव | जळगाव शहरात चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे दिवसेंदिवस उघडकीस येत आहे. चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असल्याने पोलीसांनी शिरसोली नाकावरील शिकलकर वस्तीतून एका संशयित अट्टल चोरट्याच्या घराची तपासणी केली असता, या संशयिताच्या घरातील फ्रीजमध्ये तब्बल साडे सात लाख रुपयांचे २३० ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. या चोरट्याने हे दागिने कुठून चोरले आहे. याबाबतची माहिती अद्याप तपासात समोर आलेली नसून संशयित आरोपीला रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहन, स्थागुशा पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी सापळा रचून शिरसोली नाक्यावरील शिकलवाड्यातील सोनुसिंग जगदीशसिंग बावरी वय २१ याच्या घराची झडती घेतली. यावेळी सोनुसिंगच्या आईने पिशवीतील काहीतरी वस्तु पोलीसासमक्ष फ्रिजमध्ये लपवून ठेवली. पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली.

पिशवी आढळले सोन्याचे दागिने
पोलीसांनी फ्रीजमधील पिशवी तपासली असता, यात ११ सोन्याच्या अंगठया, ५ सोन्याच्या चैन, बांगड्याचा जोड, २ सोन्याचे हार, २ जोड कानातले टॉप्स्, चांदीचे पैजण व चैन असे एकूण साडे सात लाख रुपये किंमतीचे २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. संशयित सोनुसिंग बावरी याला पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान ज्या नागरिकांच्या घरी चोरी झाली असेल त्यांनी रामानंद नगर पोलीसांशी संपर्क करून चोरीस गेलेल्या मालमत्तेची ओळख पटवून घ्यावी असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!