Type to search

क्रीडा

अजिंक्य रहाणेची उचलबांगडी, स्टिव्ह स्मिथकडे राजस्थानचे नेतृत्व

Share
जयपूर । सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने या सामन्यात एक मोठा बदल केला. राजस्थानचा नियमीत कर्णधार अजिंक्य रहाणेची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्याजागी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

स्टीव्ह स्मिथसह राजस्थानमध्ये बेन स्टोक्स आणि रियान पराग या खेळाडूंचेही पुनरागमन झाले आहे. तर जोस बटलर, ईश सोधी आणि राहुल त्रिपाठी यांना संघाबाहेर बसवण्यात आले आहे. मुंबईच्या संघात एक बदल झाला असून गोलंदाज मयंक मार्कंडेला संघात परत बोलवण्यात आले आहे.

राजस्थान 8 सामन्यात 4 गुण मिळवत गुणतालिकेत सातव्या तर मुंबई 12 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 12 धावांनी पराभव केला होता. तर मुंबईने दिल्लीला पराभवाची धुळ चारली होती. आयपीएलच्या या हंगामात रहाणेने 8 सामन्यात 201 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोर 70 धावा आहे. तर स्मिथने सात सामन्यांमध्ये 186 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये नाबाद 73 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!