अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित : तब्बू

0

25 वर्षानंतर पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू  ‘गोलमाल अगेन’ चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहेत.

पण या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी तब्बूने अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत तब्बू मस्करीत म्हणाली की,  “अजय आणि मी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्याचा शेजारी आहे आणि माझा चांगला मित्रही आहे. माझ्या करिअरने वेग घेण्यास सुरुवात केली, तेव्हापासून अजय माझ्या आयुष्यात आहे. त्यानेच आमच्या नात्याचा पाया रचला. त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर कायम नजर ठेवायचे आणि माझा पाठलाग करायचे. एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर दोघे त्याला मारण्याची धमकी देऊन पळवून लावायचे. दोघे फारच खोडकर होते. मी आज सिंगल आहे तर ते फक्त अजयमुळेच.”

 

LEAVE A REPLY

*