अखेर ‘रिंगण’च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित

0

‘लॅन्डमार्क फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘माय रोल मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘रिंगण’ ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कारावर ‘रिंगण’ने आपली मोहोर उमटवली. त्याबरोबरच ५३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांही याच चित्रपटाची छाप पाहायला मिळाली होती.

त्याशिवाय ‘कान्स’, ‘स्टट्टगर्ट’ (जर्मन), ‘लंडन’, ‘टोरंटो’ या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटानं आपलं वेगळेपण दाखवून दिलं. पण, तरीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेत बरेच अडथळे आल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

*