. . .अखेर ‘त्या’ बोगस डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल

देशदूत वृत्ताची दखल ; चांदवड उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार उघडकीस

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) : चांदवडउपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खुर्चीवर बसून रुग्णांची तपासणी करून केसपेपरवर औषधे लिहून देणार्‍या तोतया डॉक्टरचा प्रकार दै. देशदूतने उजेडात आणला होता. याची दखल घेत संबंधित फिर्याद दाखल झाल्याने सीताराम नामक अज्ञात तोतया व्यक्तीविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेस सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास डॉ. अभिजित नाईक ड्युटीवर आलेले नसताना एक रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी अधिपरिचारीका कल्पना हरी गावीत यांच्याकडे आला असता त्यांना केसपेपरवरील अक्षराबाबत शंका आल्याने त्यांनी बाह्यरुग्ण विभागात जाऊन पाहिले असता तेथे डॉक्टरांच्या
खुर्चीवर अनोळखी व्यक्ती बसल्याचे आढळून आले.

ती व्यक्ती रुग्णांची तपासणी करुन केसपेपरवर औषधे लिहून देत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत अधिपरिचारिका गावित यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली असता डॉ. नाईक यांनी ते येईपर्यंत मला रुग्ण तपासणीसाठी पाठविले असल्याचे त्या व्यक्तीने सांगीतले. त्यानंतर सदर घटनेची माहिती अधिपरिचारिका गावीत यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांना दिली.या कालावधीत रुग्णालयात गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेऊन संdeshdoot-danka-logoबंधित तोतया व्यक्ती निघून गेला.

दुसर्‍या दिवशी नागरिकांच्या चर्चेतून वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून तोतया व्यक्ती सीताराम नामक असून तो भरवीर (ता. चांदवड) येथील राहणार असल्याचे समजल्याची फिर्याद अधिपरिचारीका कल्पना गावित यांनी चांदवड पोलिसांत दिल्याने चांदवड पोलिसांनी भरवीर येथील सीताराम नामक अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

*