अखेर कृउबासची बांधकाम परवानगी रद्द

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात नियोजित व्यापारी संकुल उभारण्यासाठी मनपाने बांधकाम परवानगी दिली होती. परंतु आडत असोसिएशनने तक्रार दिल्यानंतर तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे सुनावणी झाली होती. अखेर आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बांधकाम परवानगी रद्द केली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात व्यापारी संकुल बांधण्यासाठी कृउबासने बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडून प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर अटी-शर्तीच्या आधारावर मनपाने बांधकाम परवानगी दिली.

परंतु मनपाने बेकायदेशिरपणे परवानगी दिली असून परवानगी रद्द करावी, अशी तक्रार आडत असोसिएशनने महापालिकेकडे केली. त्यानुसार तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे कृउबासचे पदाधिकारी व आडत असोसिएशनचे पदाधिकारी यांची सुनावणी झाली होती.

अखेर आयुक्त जीवन सोनवणे यांनी कृउबासच्या नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकामाची परवानगी रद्द केली.

शासनाकडे अपील करणार – सभापती

महानगरपालिकेने एकतर्फी निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार सतिमीच्या नियोजित व्यापारी संकुलाची बांधकाम परवानगी रद्द केली. त्यामुळे महानगरपालिकेच्या विरोधात शासनाकडे अपील करणार असल्याचे कृउबासचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*