अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ प्रदेश अध्यक्षपदी कुलकर्णी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नरेंद्र कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्या रुपाने नगरला प्रदेशाध्यक्षाचा पहिलाच मान मिळाला आहे.
महासंघाच्या कार्यकारणी व पदाधिकार्‍यांची बैठक नगर येथे पार पडली. या बैठकीस राज्य तसेच देशभरातील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश त्रिपाठी यांनी महाराष्ट्र प्रदेश युवाचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांची राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पांडे,राष्ट्रीय संघटनमंत्री सुरजभान पांडे, राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे, माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. श्रीकांत देशपांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैशाली देशमुख, सतीश कल्याणकर, पश्चिम विभागीय अध्यक्ष अप्पा मुळे, अ‍ॅड. बळवंत नाईक, प्रीती कुलकर्णी, माधुरी केदार, कॅनडा येथील आर. पी. सिन्हा, शुभांगी कुलकर्णी, मुख्य प्रदेश संघटक आबा एडके, जिल्हाध्यक्ष एन. डी. कुलकर्णी, विलास भालेराव, अ‍ॅड. भानुदास शौचे उपस्थित होते.
सर्वांनी संघटना वाढीसाठी सहयोगाने कार्य करा, असा सल्ला त्रिपाठी यांनी यावेळी दिला.
नरेंद्र कुलकर्णी म्हणाले, काही लोक समाजासाठी भारावून जाऊन काम करतात. परंतु संघटना व्यवस्थितरित्या बांधली गेली नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. अध्यक्षपदाच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी, तसेच समाजातील प्रत्येक स्तरात जाऊन बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी भरीव कार्य करण्याचा मानस कुलकर्णी यांनी व्यक्त केला. यात कुठलाही स्वार्थ, सत्काराची अपेक्षा न ठेवता संघटन वाढीवर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक आबा एडके यांनी केले.

अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नरेंद्र कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश त्रिपाठी, समवेत राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पांडे, राष्ट्रीय संघटनमंत्री सुरजभान पांडे, राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे, वैशाली देशमुख, आबा एडके, आप्पा मुळे, एन. डी. कुलकर्णी आदी.

LEAVE A REPLY

*