Type to search

जळगाव

अखर्चित निधी, अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा नियोजनची आज बैठक गाजणार

Share

जळगाव । जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत नेहमीच असमान निधी वाटपाबाबत आक्षेप घेऊन गोंधळ करणार्‍या जि.प.सदस्यांसह जिल्हा नियोजन समितीचे नगरपरिषदांचे सदस्य देखील या बैठकीत निधी मिळत नसल्याच्या तक्रारी मांडत होते. जिल्हा नियोजन समितीच्या या सर्वच सदस्यांना गेल्या दीड महिन्यापूर्वीच आचारसहिंता संपल्यानंतर निधीचे वाटप करण्यात आले होते. परंतु तो अखर्चित म्हणून राहिला असून त्यासह अवैध वाळू वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावरच सन 2019 च्या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजनची दुसरी तर विद्यमान शासनाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक गाजण्याची शक्यता आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या दर तीन महिन्यात एक याप्रमाणे चार बैठका होणे अपेक्षित आहे. सन 2014 पासून पालकमंत्री तथा आ.एकनाथराव खडसे, कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर, चंद्रकांत पाटील यांनी कार्यभार सांभाळला तर नुकताच पालकमंत्री पदाचा पदभार मिळालेले ना. गिरीष महाजन यांची ही पहिली व शेवटची बैठक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीनवेळा जिल्हा नियोजनची बैठक पुढे ढकलण्यात आली होती, तर लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर ना. चंद्रकांतदादांच्या काळात नियोजनची बैठक अवघ्या दीडदोन तासातच धावती अशी आटोपली होती. त्यामुळे मधल्या काळात जिल्हा परिषद व नगरपरिषदेतून निवड झालेल्या जिल्हा नियोजनच्या सदस्यांना निधी वाटप झालेला नव्हता. तो जूनच्या सुरुवातीस वितरित करण्यात आला होता. त्या अखर्चित निधीसह शहरातील महामार्गालगत समांतर रस्त्यांचा अनिर्णीत असलेला प्रश्न, जप्त डंपर अशा अनेक प्रश्नांवर ना.गिरीष महाजन कोणते आदेश देतात, याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!