अक्षर पटेलच्या खेळाने वेधले सर्वांचे लक्ष !

0
लंडन । भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने इंग्लिश काउंटी डरहममध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वॉरविकशायरविरुद्धच्या सामन्यात अक्षरने रॉयन साइटबॉटमचा मिळवलेला बळी बघण्यासारखाच आहे. या क्षणाचा व्हिडिओ पाहताना दर्शक अवाक झाल्याशिवाय राहात नाहीत. यात चेंडू शॉर्ट-लेगच्या खेळाडूच्या डोक्याला लागून तो थेट गोलंदाज अक्षर पटेलच्याच हातात स्थिरावतो. अक्षरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अक्षर पटेलने आतापर्यंत भारतासाठी 38 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 45 बळी मिळवले आहेत. अक्षरचा आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ग्लॅमॉर्गनविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात 95 धावांची दमदार खेळी खेळणार्‍या अक्षरने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन बळीही मिळवले. नॉर्थअँटसविरुद्ध पुढच्याच सामन्यात त्याने तीन बळी घेतले. वॉरविकशायरविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यात अक्षरने 9 बळी मिळवत 22 धावा जमवल्या. यावेळी त्याने सामन्याच्या तिसर्‍या डावात 7 बळीही घेतले.

काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अक्षरने वेस्ट इंडीजविरुद्ध 4 ऑॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी दावा केला आहे. अक्षरचा तीन वेळा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र तो अंतिम 11 खेळाडूंमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात अयशस्वी ठरला. त्याचा पहिल्यांदाच 2014मध्ये ऑॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जायबंदी रविंद्र जडेजाच्या जागी समावेश करण्यात आला. त्यानंतर 2016मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याचा समावेश करण्यात आला.

त्या बरोबर 2017मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता. रविंद्र जडेजावर बंदी घातली गेल्यानंतर अक्षरला ही संधी मिळाली होती. मात्र तेव्हाही अक्षरचा समावेश अंतिम 11 खेळाडूंमध्ये होऊ शकला नव्हता. काउंटी चॅम्पिननशीपने हा व्हिडिओ टिवट केला आहे. यावर 800हून अधिक टिवट करण्यात आले आहेत, तर 2000 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

LEAVE A REPLY

*